बंगरूळ प्रकरणाचा मुक्ताईनगरात निषेध

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करीत पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटक राज्यातील राजधानी बंगरूळ येथे पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर देखील राज्यातील भाजपा सुस्त पद्धतीने बसलेले आहे. छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणारा आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच यासंदर्भात दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रसंगी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विलास तायडे, बापु ससाणे, विलास तायडे, विजय सोनार, विकास पाटील, सुभाष पाटील, सोपान दुट्टे व पवनराजे पाटील यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar