⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | अत्याचार विरोधात चोपड्यात आंदोलन, पीडित परिवारासाठी न्यायाची मागणी

अत्याचार विरोधात चोपड्यात आंदोलन, पीडित परिवारासाठी न्यायाची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव येथे सहा व आठ वर्षाच्या बालिकांवर २० रोजी एका वृद्धाने अत्याचार केला होता. या प्रकरणातील दोषी आरोपीला कठोर शिक्षा व पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्या, अशा विविध मागणीचे निवेदन चोपडा तालुक्याच्या वतीने समस्त तेली समाजातर्फे तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.

चोपडा तहसील कार्यालयासमोर 23 रोजी केलेल्या आंदोलनात अती जलद गती न्यायालयात सदरचा खटला चालवण्यात यावा व अत्याचारी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागण्यांसह पिडीत कुटुंबाला संरक्षण द्यावे, दोन्ही बालकांचा भविष्यातील शिक्षणाचा खर्च शाशनाने करावा, भविष्यात दोन्ही बालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच प्रत्येक बालिकेच्या नावावर प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली.

प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. चौधरी, चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत चौधरी, चोपडा तालुका महिला अध्यक्षा सीमा चौधरी, उपाध्यक्षा योगिता चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. चौधरी, विश्वस्त चौधरी, देवकांत चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, आबा चौधरी, राजू चौधरी, गोपीचंद चौधरी, सुनील चौधरी उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदार गावित यांनी वरिष्ठांकडे मागण्यांचे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह