चाळीसगावात राष्ट्रवादीतर्फे ‘त्या’ हल्ल्याचा निषेध; चौकशीची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । जेडीसीसी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्याचा चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच येथील शहर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना आरोपीवर सक्त कारवाई व्हावी व या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, पंचायत समिती सभापती अजय पाटील, कैलास सूर्यवंशी, नगरसेवक दीपक पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, उपाध्यक्ष अमोल पवार, गुंजन मोटे, कुणाल पाटील, राकेश निकम, शुभम गवळे, भाऊसाहेब पाटील व सादिक सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -