fbpx

श्रीनगरातील हत्येचा निषेध, ‘विहिंप’कडून जळगावात निदर्शने

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याच्या निषेधार्थ शनिवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताची पावन भूमी रक्तरंजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. तसेच बलिदानी हिंदू व शीख परिवारासोबत सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.

आंदोलनात विहिंपचे सहमंत्री योगेश्वर गर्ग, पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री श्रीरंग राजे, जळगाव जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा सहमंत्री श्रीराम बारी, दीपक जोशी, राहुल जोशी, हरिभाऊ कोल्हे, उमेश सोनवणे, बापू माळी, दिनेश महाजन, कैलास जोशी, ज्ञानेश्वर कोळी आदींनी निदर्शने केली.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज