fbpx

खुशखबर…! जळगाव जिल्ह्यातील पोलिसांना पदोन्नती

mi-advt

जळगाव जिल्ह्यातील विविध संवर्गात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून तसे आदेश शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. 

आज पोलिस अधीक्षक मुंढे यांनी जळगांव जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक या पदाचे एकूण 316 पोलिस कर्मचारी यांचे पदोन्नती चे आदेश काढले. 

त्यात ९४ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी, १०० पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी, १२२ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांनी मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्बो ऑर्डर काढून पोलिसांना खुशखबर दिली आहे.

सदर कमिटीत पोलिस अधीक्षक डॉ.  प्रविण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक श्री नागेश हडपे, आस्थापना शाखेतील श्री दीपक जाधव, श्री सुनील निकम यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज