fbpx

नागेश हडपे यांना राजपत्रित प्रशासकीय अधिकारीपदी पदोन्नती

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक यांना राजपत्रित प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असून नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांची पदस्थापना करण्यात येणार आहे. राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पोलीस दलात सेवेत असलेल्या राज्यातील ६ कार्यालय अधीक्षकांना गुरुवारी पदोन्नती जाहीर करण्यात आली. जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक नागेश हडपे यांना नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात राजपत्रित प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज