शेतकी संघाच्या जागेवर लवकरच मंगल कार्यालय उभारण्याचे आश्वासन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । अमळनेर शहर व तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतकी सहकारी संघाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर लवकरच भव्य मंगल कार्यालय उभारण्यात येईल असे आश्वासन शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजरत बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख व त्यांचे शिष्ट मंडळाशी चर्चा करताना सांगितले.

हजरत बाबा ताज फाउंडेशनच्या वतीने शेतकी सहकारी संघाचे मुख्य प्रशासक यांना सदरील इमारतीच्या वरील भागात सार्वजनिक मंगल कार्यालय उभारण्यात यावे असे मागणीचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ला परिसरातील गोरगरीब व गरजू लोकांनासाठी मंगल कार्यालय उभारण्यात यावे जेणेकरून परिसरातील नागरिकांना लाभ होईल. यावेळी शेतकी सहकारी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांनी सांगितले की लवकरात लवकर आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील भागात मंगल कार्यालय उभारण्यात येईल. तसेच काम एका वर्षाच्या आत पुर्ण करु असे आश्वासन दिले.

यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील व दुसरे प्रशासक अलीम मुजावर, मॅनेजर एस.डी.पाटील हजरत बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, ऍड.अ.रज़्ज़ाक शेख राष्ट्रवादी कांग्रेस शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, क़मा भाई, प्लंबर , क़मर अली शाह, रहीम मिस्त्री मुस्तफा, मकसुद अली पहेलवान, अ.जब्बार, शराफत अली, मट्या खाटिक, अ.खालीक अहलेकार, अमजद अली शाह, समू वायरमेन, अलीम शेख अकबर सेट, मुकतार मामु भंगारवाले काले खा पठाण व आबिद अली सैय्यद आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

  
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -