fbpx

एरंडोल येथील प्रा.मनोज पाटील (पहेलवान) यांच्या प्रयत्नामुळे दिनेश पाटलांना मिळाले जिवदान

mi-advt

एरंडोल येथील रहिवासी दिनेश दयाराम पाटील वय वर्षे 39 यांना किडनी च्या आजाराने ग्रासले होते.त्यांना जळगांव येथील खाजगी हाॅस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली त्यांना किडणीचा कॅन्सर झाला असल्याचे निष्पन्न झाले.दिनेश पाटील हे शहरातील पेट्रोल पंपावर सहा हजार रुपये महिन्याने कामाला आहेत त्यात ते मोठ्या भयंकर आजाराने त्रस्त होते. त्यांना जळगांव येथील डॉक्टरांनी पाच ते सात लाख रुपये खर्च सांगितला.

याप्रसंगी एरंडोल येथील प्रा.मनोज पाटील (पहेलवान)यांच्याशी दिनेश पाटील यांच्या कुटुंबीनी संपर्क केला. पाटील यांना सर्व विषय समजावून सांगितला व प्रा.मनोज पाटील यांनी त्वरित उमरे ता.एरंडोल येथील आरोग्य सेवक सचिन पाटील यांच्या शी संपर्क साधला.सचिन पाटील यांनी मुंबई येथील डॉक्टर यांच्या सोबत चर्चा केली त्यांनी सुद्धा पाच ते सात लाख रुपये खर्च येणार असे सांगितले.

यावेळी दिनेश यांच्या कुटुंबाकडे देखील इलाजा साठी एव्हढे पैसे नव्हते.त्यामुळे  प्रा.पाटील यांनी आरोग्य सेवक श्री.सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली प्रा.पाटील यांनी त्यांच्या परिने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली.तसेच उमरे ता.एरंडोल येथील आदर्श शेतकरी भाऊसाहेब पाटील, ह.भ.प.श्रीकांत पाटील,एरंडोल येथील बाबाजी पाटील (पहेलवान),नगरसेवक नितीन चौधरी (पहेलवान), बाळा पाटील (पहेलवान), व आरोग्य सेवक  सचिन पाटील यांनी बाकीची मदत उपलब्ध केली तसेच यावेळी प्रा.मनोज पाटील मित्र मंडळाने देखील मदतीचा हात पुढे केला आणि दिनेश मुंबईला हिंदूजा हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

तेथे त्यांच्यावर पुढील उपचार डॉ.विनोद जोशी यांच्या कडे करण्यात आले. डॉ जोशी यांनी तपासणी केल्यानंतर  यांनी सांगितले की दिनेश ला किडनी चा कॅन्सर झाला आहे व दिनेश ची किडनी काढावी लागेल त्यानंतर  दिनेश च्या कुटुंबां सोबत  चर्चा केल्यावर दिनेश चे आॅपरेशन करण्यात आले व किडनी काढण्यात आली आणि  दिनेश च्या कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास सोडला व दिनेश पाटील यांच्या कुटुंबाने आमच्या मुलाचे प्राण व प्रा.मनोज पाटील (पहेलवान) यांचे व उमरे आदर्श शेतकरी भाऊसाहेब पाटील व ह.भ.प.श्रीकांत पाटील, व एरंडोल येथील श्री.बाबाजी पाटील पहेलवान,व नगरसेवक नितीन चौधरी पहेलवान, बाळा पाटील पहेलवान,उमरे येथील आरोग्य सेवक तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील,व मनोज भाऊ मित्र परिवाराचे व या सर्व लोकांचे विशेष आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज