एरंडोलात माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानातंर्गत बक्षिस वितरण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । एरंडोल नगरपालिका स्तरावर माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत बक्षिस वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांचे अध्यक्ष विनय गोसावी उपविभागीय अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुचिता चव्हाण तहसिलदार, अविनाश दहिफळे पोलिस उपनिरिक्षक, डॉ.नरेंद्र ठाकूर व नरेंद्र पाटील होते.

यावेळी कार्यक्रमांची सुरुवात स्वामी विवेकानंद व राज माता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमांचे अध्यक्ष विनय गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ज्या प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी बॅकची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आपल्यासाठी ऑक्सीजन घेणेसाठी झाडे लावणे आवश्यक आहे. तसेच विविध स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थी व बक्षिस पात्र विद्यार्थीचे अभिनंदन केले. तसेच एरंडोल नगरपालिका मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम चांगले प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत दि .२८ / १२ / २०२१ व ०३/०१/२०२२ रोजी झालेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन प्रथम, द्वितीय, तुत्तीय व उत्तेजनार्थ यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, ट्रॉफी व झाडाचे रोप देवून सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धासाठी परिक्षक म्हणून लाभलेले शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी तर प्रस्तावना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास पंचबुध्दे, डॉ.अजित भट, डॉ.योगेश सुकटे, विवेक कोळी, महेंद्र पाटील, देवेंद्र शिंदे, आनंद दाभाडे, अनिल महाजन, विक्रम घुगे व राजेंद्र घुगे यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -