fbpx

रावेर अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये आयटा युनिटतर्फे बक्षीस वितरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । रावेर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशन रावेरतर्फे बक्षीस वितरण कार्यक्रम ऍड. एस. एस. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. नुकतेच अलफैज फाउंडेशन जळगावतर्फे युपीएससी मिशन ऑनलाई स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. 

या स्पर्धेमध्ये सर्वत्तम गुण मिळवून यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॅफी व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सर्वप्रथम पवित्र कुरान पठन करण्यात आले.

हे होते प्रमुख पाहुणे

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उर्दू केंद्रप्रमुख रईसोद्दीन शेख, शेख आरीफ, सैय्यद आरीफ, अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक नासीर खान, उर्दू गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापिका नुरजहाँ शेख, अलहसनात उर्दू प्रा शाळा चे मुख्याध्यापक फिरोज खान, जि. प. उर्दू शाळा चे मुख्याध्यापिका यास्मीन बानो, पत्रकार समशेर खान,अजीज शेख, सरदार पिंजारी, युसुफ खाटीक, फिरोज खान,जाकीर खान, सैय्यद आदील अब्दुल्ला खान, शेख वसीम, शे. सुभान आदी उपस्थित होते. 

यावेळी प्रथम गटातील

तालुका स्तरावर स्पर्धकांना व दुसऱ्या गटातील तीन स्पर्धकांना प्रथम  द्वितीय व तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले. यात पहिला गट ईत्ता ९ वी मुजन्ना तहसीन फिरोज खान अँग्लो उर्दू हायस्कूल (प्रथम) जिशान खान समशेर खान (द्वितीय) अँग्लो उर्दू हायस्कूल  शिफा नाज अब्दुल्ला खान (तृतीय)उर्दू गर्ल्स हायस्कूल  व शाळेतील महवीश रईसोद्दीन उर्दू गर्ल्स हायस्कूल तर दुसर्‍या गटातील तनजीला बी शेख सुभान (प्रथम)अँग्लो उर्दू हायस्कूल शेख आकीब शेख वसीम (द्वितीय)अँग्लो उर्दू हायस्कूल  जुबीया तहसीन मलक अनीस (तृतीय) व शाळेतील अबुजर खान अय्युब खान अँग्लो उर्दू हायस्कूल आणि इरम सैय्यद मुश्ताक  उर्दू गर्ल्स हायस्कूल असे स्पर्धा विजेत्यांची नावे असून. 

यावेळी अँड एस एस सैय्यद आणि उर्दू केंद्रप्रमुख रईसोद्दीन शेख यांनी शिक्षणाचे महत्त्व पुर्ण मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शफीक जनाब यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयटा रावेर युनिट चे अध्यक्ष शे. शरीफ शे. सलीम सचिव सलमान अली, सैय्यद मुजाहीद अली, फरहान अहमद, मलक अनीस, आभार आयटा चे अध्यक्ष शे. शरीफ यांनी मानले. व आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज