एरंडोल येथील प्राचार्या यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सम्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । बचपन स्कुल एरंडोल येथील संस्थापक अध्यक्षा व प्राचार्या प्रा.सौ.सुरेखा प्रमोद पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील १० वर्षांच्या उत्कृष्ट भरिव कामगिरीबद्दल एस.के.एज्युकेशन दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संस्थेतर्फे यंदाचा Maestro Award 2021 Delhi.या कार्यक्रमात “द बेस्ट कौन्सिलर ऑफ इंडीया इन बचपन” या राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

या विशेष पुरस्कारामुळे प्रा. सौ.सुरेखामॅडम यांचे शिक्षणक्षेत्रात तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे प्रदिर्घ परिक्षणातून या पुरस्कारासाठी मुल्यांकन होत असते. त्यामुळे एरंडोलचे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाण्यासाठी त्यांचे योगदान लाभले.

भारतभरातून फक्त ३ व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्यात आला.त्यातही हा पुरस्कार पटकवणा-या महाराष्ट्रातील सुरेखा पाटील ह्या एकमेव व्यक्ती आहेत. इतर दोन पुरस्कार राजस्थान व तेलंगाना या राज्यातील व्यक्तीना मिळाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar