रावेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दलाल‎ पर्यावरणदूत‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । रावेर‎च्या व्ही.एस.नाईक कला,‎ वाणिज्य आणि विज्ञान‎ ‎ महाविद्यालयाचे‎ ‎ प्राचार्य‎ ‎ डॉ.पी.व्ही.‎ दलाल यांची‎ ‎ रावेर पालिकेने‎ ‎पर्यावरण दूत व‎ स्वच्छ भारत अभियानासाठी ब्रँड‎ ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.‎

डॉ.दलाल शहरात पर्यावरण व‎ स्वच्छतेबाबत जनजागृती करतील.‎ तत्पूर्वी, पालिकेने माझी वसुंधरा‎ अभियान व स्वच्छ भारत‎ अभियानात सहभाग नोंदवला आहे.‎ पालिकेतर्फे पर्यावरणाचे संरक्षण‎ करण्यासह स्वच्छतेबाबत‎ नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे‎ अभियान राबवले जाणार आहे.‎ त्यात विद्यार्थी व नागरिकांमध्ये‎ ‎ पर्यावरण व स्वच्छता संबंधित‎ जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात‎ येतील, अशी माहिती प्राचार्य‎ डॉ.दलाल यांनी दिली. ‘माझे शहर‎ सुंदर रावेर’ या संकल्पनेवर‎ आधारीत कृती आरखडा प्रकल्पात‎ ५ वी ते १२ वी, महाविद्यालयीन‎ विद्यार्थी गट व खुला गट अशा‎ प्रकारात स्पर्धा घेण्यात येतील.‎ डिजिटल माध्यमातून ‘माझे शहर‎ रावेर माझी जबाबदारी’ या विषयावर‎ वक्तृत्व स्पर्धाचे होईल.‎

महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या‎ प्रभागात स्वच्छता स्वयंसेवक म्हणून‎ कार्य करतील.‎ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं‎ सेवकांमार्फत जनजागृती करून‎ रावेर शहराला सुंदर बनवण्यासाठी‎ प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य‎ दलाल यांनी सांगितले. संस्थेचे‎ चेअरमन हेमंत नाईक यांनी त्यांचे‎ कौतुक केले.‎

हे देखील वाचा :

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -