fbpx

‘जुनं ते सोनं’ : १० पैशांच्या नाण्याला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही त्या जुन्या नाण्यापासून चांगली भक्कल कमाई करू शकता. होय…हे खरं  असून अनेक वर्षांपूर्वी चलनातून बाद झालेल्या १० पैशांच्या नाण्याला एका ऑनलाइन साइट्सवर तब्बल १०० पटीने जास्त पैसे मिळू लागला आहे. १० पैशांच्या नाण्याला १५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या सोशल साइट्सवर नाणी विक्री केली जात आहेत.

काही जण ही नाणी चलनात नसल्याने व आत्याच्या अत्याधुनिक आणि डिजिटल युगात काही महत्व नसल्याचं समजून फेकून देतात. मात्र, आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात या जुन्या नाण्यांचा काळ पुन्हा परतला आहे. अनेक ऑनलाइन साइट्सवर जुन्या नाण्यांना मोठी मागणी आहे. जेवढी जुनी नाणी तेवढा जास्त भाव मिळत आहे. १० ते २० पैशांच्या नाण्यांना १५० ते २०० रुपये एवढा भाव आहे, तर इंग्रजांच्या काळातील नाण्याला ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. हेच भाव जुन्या नोटांनादेखील मिळत आहे.

अनेकांना जुन्या वस्तू व नाण्यांचा संग्रह करण्याची आवड असते, अशा नागरिकांकडून ऑनलाइन साइट्सवर जुन्या नाण्यांना मागणी दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या साइट्सवर अशाच जुन्या वस्तूंच्या शोधात असतात, अनेक विक्री करणाऱ्या साइट्सवर ही जुनी नाणी विक्रीसाठी ठेवून अनेकांना चांगला पैसा कमाविण्याचीही संधी उपलब्ध होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज