कृषीपंप चोरीच्या घटना रोखा, आ.चंद्रकांत पाटील यांची सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । उदळी, तासखेडा, रायपूर, गहूखेडा, रणगाव, सुदगाव या भागातील शेतकऱ्यांच्या तापी नदीवरील कृषी पंपाची चोरी व नासधूस करण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचेकडे कैफियत मांडली होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सावदा विश्रामगृहात सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली.

दरम्यान, बैठकीत सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्याशी चर्चा करताना आमदार पाटील म्हणाले की, कृषी पंपाची चोरी, नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पोलिस प्रशासनाने या घटनांची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशा सूचना केल्या.

यांची उपस्थिती होती 

रायपूर येथील शेतकरी हेमराज पंडित पाटील, मधुकर पाटील,सरपंच विश्वनाथ कोळी, शिवसेना तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी, नगरसेवक फिरोज खान पठाण, शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, भरत नेहते, शिवसेना शहर संघटक नीलेश खाचणे, शरद भारबे, युवासेना प्रमुख मनीष भंगाळे, गणेश माळी, अक्षय नेमाडे, किरण गुरव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज