⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले, अंगठी, रोकड घेऊन पोबारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । आम्ही पोलिस आहोत, परिसरात गांजाची तस्करी होत असल्याने आम्हाला तुमची तपासणी करायची आहे. अशी बतावणी करत दोन भामट्यांनी वृद्धाला लुटल्याची घटना, धानोरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. या प्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून अडावद पोलिसांत गुन्हा झाला आहे.

सविस्तर असे की, धानोरा येथील शेतकरी काशिनाथ सुकलाल महाजन (वय ७२) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी, शेतात फेरफटका मारण्यासाठी आपल्या स्कुटीने जात होते. वाटेत आस्था नगरजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले. आम्ही पोलिस आहोत, परिसरात गांजाची तस्करी होत असल्याने आम्हाला तुमची तपासणी करायची आहे, असे दोन्ही भामट्यांनी महाजन यांना सांगितले. त्यानंतर दुचाकीची तपासणी करत भामट्यांनी महाजन यांच्या हातातील दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि पाकिटातील एक हजार रुपये काढून घेतले. तसेच भामटे लागलीच पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महाजन भांबावले होते. त्यामुळे त्यांनी भामट्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहिलाच नाही.

याप्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात कलम ४२०, १७० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. हवालदार जयदीप राजपूत पुढील तपास करत आहेत.

हे देखील वाचा :