गरोदर आदिवासी महिलेचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर आदिवासी महिलेचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत असे कि, चोपडा तालुक्यातील कालीकुंडी येथील बारेला कुटुंबिय रोजगारासाठी गेल्या चार वर्षापासून जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील वास्तव्यास आहे. याठिकाणी शेतात मजुरीचे काम करुन शेतातच कुटुंबिय वास्तव्यास आहेत. गरोदर होवून आठ महिने पूर्ण झाले असतांना बुधवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मीनाच्या पोटात दुखायला लागले.

त्यामुळे कुटुंबियांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिला थेट जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीपूर्वीच मीनाचा बारेला हिचा मृत्यू झाला. तिच्या पोटात बाळाचा मृत्यू झालेला होता. तिच्या पश्‍चात पती, दिनेश बारेला, सासरे, सासू असा परिवार आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -