यावल येथे सामान्यज्ञान स्पर्धेत‎ प्रीती निळे प्रथम ‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । यावल येथील कला ,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत, २६ रोजी‎ ‎ महाविद्यालयातील सर्व शाखेच्या‎ ‎ विद्यार्थ्यांसाठी मराठी सामान्यज्ञान‎ ‎ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.‎ ‎या स्पर्धेत एकूण २१३ विद्यार्थ्यांनी‎ ‎आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेत‎ ‎ एसवायएबीएससी वर्गाची विद्यार्थिनी‎ प्रीती निळेने प्रथम क्रमांक मिळवला.‎

विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात भर पडावी, त्यांचा स्पर्धा‎ परीक्षेच्या दृष्टीने सराव व्हावा व त्यांच्यात चौफेर वाचनाची‎ गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन प्रभारी‎ प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या प्रेरणेतून करण्यात आले‎ होते. या स्पर्धेत प्रिती निळे प्रथम, दिव्या निळे‎ (एफवायबीएससी)द्वितीय व रिजवान तडवी‎ (एफवायबीएससी) याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच‎ सोनल वाघ (एसवायबीकॉम) व अश्विनी गजरे‎ (एफवायबीए) यांना उत्तेजनार्थ बक्षीस घोषित करण्यात‎ आले. स्पर्धेचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डाॅ. सुधा‎ खराटे यांनी केले होते. उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील, प्रा .एम.‎ डी. खैरनार, संजय पाटील, विभागाचे सहकारी सुभाष‎ कामडी यांनी कौतूक केले.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -