मराठी पत्रकार संघा एरंडोल तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद शंकपाळ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । लोकशाही मराठी पत्रकार संघ ( महाराष्ट्र राज्य ) एरंडोल तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद शंकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले यांनी केली .

नियुक्ती करण्याचे आशय, तालुक्यातील खेड्यापाड्यातील काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्याला वेळप्रसंगी अपमान देखील सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम लोकशाही पत्रकार संघ करणार आहे. तसेच उत्सुक पत्रकारांनी लोकशाही पत्रकार संघात सहभागी झाले पाहिजे असे आव्हान यावेळी पत्रकार संघाचे नवनियुक्त तालुका उपाअध्यक्ष प्रमोद शंकपाळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -