भुसावळ पालिकेच्या उपाध्यक्षपदी खडसेंचे कट्टर समर्थक प्रमोद नेमाडे यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । भुसावळ येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची निवड करण्यात आली आहे. आज पालिका प्रशासनाच्या झालेल्या ऑनलाईन सभेत ही निवड करण्यात आली आहे.

भुसावळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली होती.  यासाठी दोन-तीन सदस्यांची नावे चर्चेत होती. अखेर आज या रिक्त पदावर ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची उपाध्यक्षपदी पदी निवड झाली.

प्रमोद नेमाडे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना उपनगराध्यक्षपदासाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर निवडणुकीआधी अजून एका सदस्याला दोन महिन्यांसाठी संधी मिळणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज