fbpx

समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रमोद महाजन यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद महाजन यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जळगाव युवक  जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते नामदार छगन भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असताना समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या आदेशाने युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी ही निवड केली.

mi advt

यावेळी विभागीय संघटक अनिल नाळे,विभागीय समन्वयक नितीन शेलार, गजानन महाजन, सागर महाजन ,माजी नगरसेवक संजय महाजन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज