fbpx

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रकाश सरदार

प्रदेश सचिवपदी प्रकाश तायडे तर उपाध्यक्षपदी मन्साराम कोळी यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची महाराष्ट्राची नवीन प्रदेश कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी पदाधिकार्‍यांनी पदभार सोपवण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता शब्बीर शेख होते. 

प्रास्ताविक प्रदेश सचिव प्रकाश तायडे तर सूत्रसंचलन ज्येष्ठ सल्लागार  रंगराव आव्हाड यांनी केले. कार्यक्रमात मार्गदर्शन प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, मनोगत शाखा अध्यक्ष राजगोपाल तेलंग, शाखा सचिव रामचंद्र तायडे यांनी केले. 

नविन प्रदेश कार्यकारणी अशी

प्रदेशध्यक्ष- प्रकाश सरदार, प्रदेश उपाध्यक्ष- मन्साराम कोळी, प्रदेश सचिव- प्रकाश तायडे, प्रदेश सह सचिव – नारायण झटके, प्रदेश कोषाध्यक्ष – संतोष तेलंग, प्रदेश संघटक – उस्मानखान पठाण, सदस्य- तौसीफखान पठाण यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांचा सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सत्कार केला. यावेळी सूरेंद्रसिंग ठाकूर, संजय रावलकर, सुरेश टाक, संजय अडकमोल, सैय्यद मुमताज, रवींद्र सरदार, हरपाल संसोये, संदीप पाटील, साजी, शेख शकील, इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज