यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘प्रहार जनशक्ती’ पुर्ण ताकदनिशी उतरणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । यावल नगरपरिषदेच्या होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी सर्व जागा लढवणार असल्याची माहीती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरपरिषदचे विद्यमान उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी, प्रहारचे यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष मोहम्मद शेख हकीम, यावल-रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख, अल्पसंख्यांकचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी हाकीम खाटीक, शकील शेख, यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, खलील शेख, रफीक टेलर, गोकुळ कोळी, नितिन कोळी, शेख निजाम, सागर चौधरी, तन्वीर मन्यार, युनुस खन्ना, उमर अली कच्छी आदी आदी उपस्थित होते

पुढे बोलतांना श्री. चौधरी म्हणाले की, यावल नगरपरिषदेच्या नुतन साठवण तलावाच्या उभारणीत झालेल्या कथीत भ्रष्टाचारास आपण शहरातील जनतेसमोर घेवुन जाणार असून प्रहारच्या हातात नगरपरिषदेची सत्ता आल्यास साठवण तलावात भ्रष्टाचार करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यापुर्वी किती नगराध्यक्ष नगरपरिषदेत होवुन गेले, मात्र खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर यावल शहराचा विकास झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित करून यावल शहराच्या विकासाचे व्हीजन घेवुन प्रहार पक्ष ही निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या निवडणुकीत यावलकर मंडळी अत्यंत गार्भीयांने विचार करून निर्णय घेतील, असेही ते यावेळी म्हणाले.

…तर ‘मविआ’त सामिल होऊ
महाविकास आघाडी सोबत जाणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल चौधरी यांनी यावल नगरपरिषद वगळता इतर ठीकाणी जर असा प्रस्ताव आला तर आम्ही आघाडीत सामिल होऊ, असे सांगीतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज