काँग्रेसच्या चोपडा तालुकाध्यक्षपदी प्रदीप पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । प्रदीप लिंबा पाटील यांची काँग्रेसच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सविस्तर असे की, येथील काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नाना पटोले यांच्या आदेशावरून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी प्रदीप लिंबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या चोपडा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेकांनी प्रदीप पाटील यांचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -