अमळनेर येथे विश्वासराव फाउंडेनतर्फे पोस्टमन बांधवांचा सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । विश्वासराव फाउंडेनतर्फे अमळनेर पोस्ट कार्यालयातील पोस्टमन लोकांचा सत्कार करण्यात आला तर अपंग व गरजूंना सायकल तसेच संगणक वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, मनसे तालुकाध्यक्ष अधिकराव पाटील, रवींद्र मोरे, विश्वासराव फाउंडेशनचे चेअरमन अतुल शिसोदे, प्रविण पाटील, प्रदिप पाटील आदींनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी कार्यक्रमात सब पोस्टमास्टर एन. एस. शेख यांच्यासह १३ पोस्टमन लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उमेश भदाणे व सचिन कोळी या अपंग बांधवांना सायकल देण्यात आल्या संदेश शिंदे व प्रांजल वसईकर यांना संगणक संच देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या मेडरिच हेल्थकेअर या प्रकल्पाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे जपलेले सामाजिक भान लक्षात घेता आयोजित उपक्रमाचे डॉ. अनिल शिंदे आणि पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले तर आभार रवींद्र मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -