fbpx

पोस्टाची जबरदस्त योजना…१४०० रुपयांच्या प्रीमियमवर ३५ लाख मिळणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । देशात गुंतवणूक करताना इंडिया पोस्ट हा सर्वात विश्वसनीय पर्यायांपैकी एक आहे. पोस्टाच्या योजनांमध्ये सुरक्षित परताव्याची हमी असल्यामुळे सर्व श्रेणीतील नागरिक त्यावर विश्वास ठेवतात. दरम्यान,पोस्ट ऑफिसने अनेक विविध योजना आणल्या आहेत. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल जाणून घेऊयात, जी तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर कव्हर देईल.

ग्राम सुरक्षा योजना असे या पोस्ट ऑफिसच्या योजनेचे नाव आहे. ज्यात मृत्यूच्या पश्च्यात होणाऱ्या लाभासोबतच ग्राहकांना परतावर रक्कम सुद्धा भारी मिळणार आहे. या दोन्ही फायद्या सोबत ग्राहकांना आकर्षक बोनस मिळतं रहातं. ही योजना अतिशय उत्तम आहे.

ग्राम सुरक्षा योजनेसाठी किमान प्रवेश वय 19 वर्षे आणि कमाल प्रवेश वय 55 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये आहे. कर्जाची सुविधा 4 वर्षांनंतर उपलब्ध आहे. ही योजना 3 वर्षांनंतरही सरेंडर केली जाऊ शकते.

जर तुम्ही पॉलिसी घेतल्याच्या पाच वर्षांच्या आत ग्राम सुरक्षा योजना सरेंडर केली तर बोनसचा लाभ मिळणार नाही. यामध्ये प्रीमियम भरण्याचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. 55 वर्षे, 58 वर्षे आणि 60 वर्षे. पोस्टल इन्फो मोबाईल अॅपवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या इंडिया पोस्टने यासाठी प्रति हजार 60 रुपये बोनस दिला आहे.

जर कोणी वयाच्या 19 व्या वर्षी पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी नावनोंदणी केली तर त्याच्यासाठी प्रीमियमची मुदत 36 वर्षे, 39 वर्षे आणि 41 वर्षे असेल. त्याने 55, 58 किंवा 60 वर्षांमध्ये कोणता पर्याय निवडला यावर अवलंबून आहे. जर वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखांची विमा रक्कम घेतली गेली तर परिपक्वता रक्कम सुमारे 35 लाख असेल.

19 वर्षांच्या वयात 10 लाख विमा रकमेची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केल्यावर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. 55 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 34.60 लाख रुपये असेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज