fbpx

पोस्टाच्या ‘या’ योजनेत दरमहा २२०० रुपये भरा अन 29 लाख मिळवा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट  २०२१ । प्रत्येक जण आपल्या दुःख सुखासाठी पैसे जमा करून ठेवत असतो. सर्वसामान्यांना पैशाची बचत करून ठेवणे हि तर काळाची गरज बनली आहे. दरम्यान, देशात कमी व्याज मिळाले तरी चालेल पण जमविलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टामध्ये पैसे ठेवू लागले आहेत.

पोस्टाच्या अशा काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. जर आपण कमी प्रीमियम आणि जास्त परतावा बघितला, तर पोस्टाची जीवन विमा पॉलिसी सर्वोत्तम मानली जाऊ शकतो, कारण त्याच्या पैशाला सरकारकडून संरक्षण मिळते.

ही पॉलिसी 1884 पासून देशात सुरू आहे. ही पॉलिसी कमी प्रीमियमसह उच्च परतावा देते आणि सरकार त्याच्या परिपक्वताची हमी देखील देते. यामध्ये सुरक्षा, संतोष, सुविधा, सुमंगल, दाम्पत्य सुरक्षा आणि बाल जीवन विमा या पॉलिसींचा समावेश आहे. पूर्वी फक्त सरकारी नोकरी असलेले लोक ही पॉलिसी विकत घेऊ शकत होते, परंतु आता त्याची व्याप्ती खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि व्यावसायिकांपर्यंत वाढवण्यात आली.

संपूर्ण जीवन सुरक्षा पॉलिसी 80 वर्षांत परिपक्व होते. पॉलिसीधारकाचे वय 80 वर्षे असेल, तेव्हा ही पॉलिसी मॅच्युरिटी होईल. 55, 58 आणि 60 वर्षे वयापर्यंत त्याचे प्रीमियम भरता येते. ही पॉलिसी 19 वर्षांच्या वयापासून ते 55 वर्षांच्या वयापर्यंत घेता येते.

यामध्ये किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि कमाल 50 लाख रुपये आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून 4 वर्षांनंतर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्हाला 3 वर्षांनंतर हवे असेल तर तुम्ही ही पॉलिसी सरेंडर करू शकता. या पॉलिसीमध्ये बोनस उपलब्ध आहे, जो 76 रुपये प्रति 1000 रुपयांच्या दराने दिला जातो.

१) सुरक्षा पॉलिसी
समजा एक ३० वर्षीय व्यक्ती सुरक्षा पॉलिसी विकत घेतो आणि त्याने 10 लाखांची विमा रक्कम म्हणून निवडली आहे. त्याने 55 वर्षांपर्यंत प्रीमियम भरणे पसंत केले. जर आता वय 30 वर्षे असेल तर पुढील 25 वर्षे प्रीमियम भरावा लागेल, यासाठी त्याला दरमहा 2200 रुपये द्यावे लागतील. या पॉलिसीची मॅच्युरिटी 80 वर्षे असेल. त्यावेळी त्या व्यक्तीस मॅच्युरिटी म्हणून 29 लाख रुपये मिळतील. म्हणजेच 10 लाखांच्या पॉलिसीवर 29 लाख रुपये हातात येतील. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल.

२) संतोष पॉलिसी 
19 वर्षांपासून 55 वर्षांपर्यंतची व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. यामध्ये पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी 35, 40, 50, 58 आणि 60 वर्षे आहे. म्हणजेच ही पॉलिसी या वर्षांमध्ये मॅच्युरिटी होऊ शकते. यामध्ये किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि कमाल 50 लाख रुपये आहे. तुम्ही पॉलिसी विरुद्ध 3 वर्षांनंतर कर्ज घेऊ शकता. आपण इच्छित असल्यास आपण 3 वर्षांनंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकता. यामध्ये प्रत्येक 1000 रुपयांसाठी 52 रुपयांचा बोनस उपलब्ध आहे.

समजा 30 वर्षांच्या व्यक्तीने 10 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी संतोष पॉलिसी विकत घेतली. त्यांनी पॉलिसीचे मॅच्युरिटी वय 50 वर्षे निश्चित केले, यासाठी 4000 रुपये प्रीमियम दरमहा 50 वर्षांच्या वयापर्यंत म्हणजेच पुढील 20 वर्षे भरावा लागेल. ही पॉलिसी 20 वर्षांनंतर मॅच्युरिटी होईल आणि नंतर 20,40,000 रुपयांची रक्कम उपलब्ध होणार आहे. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल. जर पॉलिसीदरम्यान धारकाचा मृत्यू झाला, तर मृत्यूचा जो काही फायदा होईल, तो नामांकित व्यक्तीला मिळणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt