fbpx

महिन्याला 2 हजार रुपये गुंतवा अन् ६ लाख मिळवा, जाणून घ्या पोस्टाची योजना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ ।  कोरोना काळात अनेकांचे हाताचे काम बंद पडले तर अनेक बेरोजगार झाले. त्यात अनेकांकडे बचत केलेले पैसे देखील संपले. पैशांची बचत करणे ही तर काळाची गरज आहे. पैशांची बचत करताना ते योग्य ठिकाणी गुंतविणेदेखील गरजेचे असते.  बँकेतील योजनेत गुंतवणूक केली तर कमी व्याज मिळते आणि येथे अधिक व्याज असते तिथे धोका अधिक असतो. अशात अशी एका योजना आहे जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि व्याज दर देखील चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.  या स्कीममध्ये सध्या 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे.

खास बाब म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करायचे आहेत. 15 वर्षांनी तुम्हाला त्याचे 6,31,135 रुपये मिळतील. आता प्रश्न हा आहे की, एवढी मोठी रक्कम कशी मिळेल आणि एकूण किती पैसे गुंतवावे लागतील? चला जाणून घेऊया.

पहिली महत्वाची बाब म्हणजे ही स्कीम 15 वर्षांसाठी आहे. यातून मध्येच पैसे काढता येत नाहीत. 15 वर्षांनी तुम्ही याची मुदत 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा दिला जातो. जर तुम्ही 15 वर्षांसाठी दर महिन्याला 2 हजार रुपये गुंतविले तर एकूण 3,36,000 रुपयांची रक्कम जमा होईल. यावर तुम्हाला 2,71,135 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेय मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 6,31,135 रुपये हाती येतील.

पीपीएफ खाते उघडण्य़ासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये खर्च करावे लागतील. एका आर्थिक वर्षात कमीतकमी 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. तसेच कमीतकमी 500 रुपये गुंतवू शकता. वर्षाला 500 रुपये गुंतविले नाहीत तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रीय होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज