fbpx

पोस्टाची भारी योजना ! ५ वर्षांत १३२००० रुपये परतावा मिळवा, कसे जाणून घ्या?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । देशात कमी व्याज मिळाले तरी चालेल पण जमविलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टामध्ये पैसे ठेवू लागले आहेत. भारतीय आणि पोस्ट ऑफिस यांच्यातील नाते हे विश्वासाचे आहे. जर तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी Post Office Monthly Income Scheme (POMIS) एक चांगला पर्याय आहे.

यात गुंतवलेल्या रकमेवर व्याज स्वरूपात हमी उत्पन्न उपलब्ध आहे. यावरील व्याजदर वित्त मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे निश्चित केले जाते. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या त्रुटीचा प्रश्न नंतर उद्भवत नाही.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) सध्या 6.60 टक्के व्याज दिले जात आहे. जे अन्य एफडी किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा खूप चांगले आहे. या मासिक योजनेमध्ये दरमहा व्याज जमा होते. हे व्याजाचे पैसे कमाई म्हणून वापरले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांना हवे असल्यास ते हे पैसे ऑटो ट्रान्सफरमध्ये टाकू शकतात. म्हणजेच व्याजाचे पैसे तुमच्या बचत खात्यात दर महिन्याला पोस्ट डेट चेक किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमद्वारे जमा होत राहतील.

मासिक योजनेची मॅच्युरिटी झाल्यावर त्याचे पैसे त्याच योजनेत जमा केले जाऊ शकतात. जर पोस्ट ऑफिस मासिक योजनेचे पैसे मुदतपूर्तीवर काढले गेले नाहीत, तर या खात्यावर 2 वर्षे व्याज मिळत राहील. व्याजाच्या रकमेवर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. व्याजाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम करांच्या अधीन आहे.

याकडे लक्ष हवेच….

या योजनेचा अवधी पाच वर्षांचा आहे. जर त्या आधी तुम्ही पैसे काढले तर नुकसान होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तर दुसऱ्या वर्षी गुंतवलेले पैसे काढायचे असल्यास 2 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते. ३ ते ५ वर्षे अवधीत काढल्यास 1 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील व्याजाची गणना करणे खूप सोपे आहे. या सोप्या सूत्राने कोणताही गुंतवणूकदार व्याज उत्पन्नाची गणना करू शकतो. हे तुम्ही एका साध्या उदाहरणाद्वारे समजू शकता. कुमार यांनी 2020 मध्ये पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेत 4 लाख रुपये जमा केले. ही गुंतवणूक योजना उघडताना व्याजाचा दर 6.60 टक्के निश्चित करण्यात आला होता. जर या आधारावर व्याज मोजले गेले तर कुमार दरमहा 2200 रुपये कमावतील. अशा प्रकारे जर ही योजना 5 वर्षे चालली तर कुमारला 1,32,000 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच 4 लाख रुपये एकरकमी जमा करून तुम्ही दरमहा 2200 रुपये आरामात कमावू शकता.

मासिक योजनेचे लाभ

ही योजना बाजाराशी जोडलेली नाही, त्यामुळे बाजारातील चढ-उतारांवर काही फरक पडत नाही. या योजनेला सरकारचा पाठिंबा आहे, त्यामुळे ही योजना पूर्णपणे हमी आहे. या योजनेचे दोन प्रमुख फायदे आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज