पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पती -पत्नीला मिळतोय डबल लाभ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । जर तुम्ही नोकरी व्यतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. या व्यतिरिक्त, ही योजना पती पत्नीला डबल लाभ देऊ शकते. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (Post Office MIS) असं या योजनंचं नाव आहे. याशिवाय, तुम्हाला यात संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही मिळते. यात तुम्हाला दुहेरी लाभ कसा मिळू शकतो ते आम्ही तुम्हाला सांगू.

पोस्टाच्या या खास योजनेअंतर्गत पती-पत्नी मिळून 59400 रुपये वार्षिक कमाई करू शकतात.  तुमच्या मंथली कमाईबाबत बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला दरमहा 4950 रुपये मिळतील. योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट खातं उघडू शकता.

वैयक्तिक खातं उघडल्यास तुम्ही कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. मात्र तुम्ही जॉइंट खातं उघडणार असाल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. ही योजना निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज दर 6.6 टक्के मिळत आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाते.

योजनेचे फायदे?
एमआयएसमधील चांगली गोष्ट अशी आहे की दोन किंवा तीन लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्यास समान दिले जाते. संयुक्त खाती कधीही सिंगल खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. एकल खाते देखील संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल.

उदाहरणासह उत्पन्न कसे असेल ते समजून घ्या?

समजा पती -पत्नीने या योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले आहेत. 6.6 टक्के व्याज दराने 9 लाखांच्या ठेवीवर वार्षिक परतावा 59,400 रुपये असेल. जर ते 12 भागांमध्ये विभागले गेले तर ते 4950 रुपये मासिक असेल. म्हणजेच, तुम्ही तुमच्या खात्यात दरमहा 4950 रुपये मागू शकता. त्याच वेळी, तुमची मुख्य रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील.  हवे तर 5 वर्षानंतर तुम्ही आणखी 5-5 वर्षांसाठी गुंतवूकीचा कालावधी वाढवू शकता.

कृपया अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा…

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar