पोस्टाची दमदार योजना : फक्त ९५ रुपये दररोज द्या आणि मिळवा १४ लाख

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ ।  सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक बचत करणं फार महत्त्वाचं आहे. गरजेच्या वेळी ही बचतच उपयुक्त ठरते. अशात तुम्ही जर बचतीचा विचार करत असाल तर पोस्टाची अशी एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 95 रुपये जमा केल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला कमीत-कमी 14 लाख रुपये मिळतील. ‘ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा’ असे या योजनेचे नाव आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर जीवंत असल्यास मनी बॅकचाही फायदा मिळतो. म्हणजेच जितकी गुंतवणूक केली ती परत मिळते

ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बचत करणे खूप अवघड असते. कारण छोट्या खेड्यामध्ये बँकांचे प्रमाण खूप कमी असते. अनेक लहान गावांमध्ये बँका नसतात. जवळच्या मोठ्या गावात बँक असते. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेत दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही मुदतीअंती 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता.  

योजनेचे फायदे

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन वीमा योजनेत मनी बॅकची सुविधा आहे. यात खातेधारकाला जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचा सम अश्युर्ड मिळतो. जर पॉलिसीधारक योजनेच्या मॅच्युरिटीपर्यंत जीवंत राहिल्यास मनी बॅकचा लाभ मिळतो. हा लाभ तीन वेळा मिळतो. 15 वर्षांच्या पॉलिसीत 6 व्या वर्षी, 9 व्या आणि 12 व्या वर्षी 20-20 टक्के पैसे मिळतात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित 40 टक्के पैसे मिळतात.

20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी मनी बॅक स्वरुपात 20-20 टक्के पैसे मिळतात. उर्वरित 40 टक्के पैसे मॅच्युरिटीनंतर मिळतात. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला योजनेच्या रकमेसह बोनस दिला जातो.

इतका भरावा लागेल हप्ता 

जर एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल तर सात लाख रुपयांच्या रकमेसाठी 20 वर्षांच्या मुदतीकरिता दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. वार्षिक प्रीमियम 32 हजार 735 रुपये असेल. सहा महिन्यांसाठी तो 16 हजार 715 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 8 हजार 449 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज