fbpx

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ना.छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चर्चा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । एरंडोल अ.भा महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, ना.छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओ.बी.सींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी आरक्षण पे चर्चा ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज येथे समता परीषदेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अनिल नळे, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, राजु महाजन, सा.माळी साम्राज्य पेपर चे संपादक भुषण माळी यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राथमिक चर्चा केली.

यावेळी विविध ओ.बी. सी. संघटनांचे अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष अरुण महाजन ,गोपाल शामु पाटील, रामभाऊ गांगुर्डे, डॉ.अतुल सोनवणे,नगरसेवक योगेश महाजन,संदिप पाटील,संघरत्न गायकवाड ,माजी नगरसेवक संजय महाजन ,गजानन महाजन, गोपाल यादव महाजन,शहर अध्यक्ष सागर महाजन, प्रमोद महाजन, कमलेश महाजन,निलेश महाजन रवींद्र महाजन उपस्थित होते.

यावेळी एरंडोल येथे ओ.बी.सी. मेळावा घेण्या बाबत चर्चा झाली. मेळाव्या विषयी लवकर दिनांक व वेळ निश्चित करून कळविण्यात येईल असे आवाहन एरंडोल महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt