⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार? दिल्लीत घेतली शहांची भेट?

एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार? दिल्लीत घेतली शहांची भेट?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी या चर्चांचे खंडण केले आहे.

काय म्हणले एकनाथ खडसे?
‘नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत, तसंच अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का? माझा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी परिचय आजचा नसून फार पूर्वीपासूनचा आहे. मी अमित शहांना एकदाच भेटलो असं नाही, या आधीही मी अनेकदा त्यांना भेटलो आहे आणि नंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींनाही मी आधी भेटलो आणि पुढेही भेटणार आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही,’ असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

तसेच एकनाथ खडसे यांची सून व खासदार रक्षा खडसे यांनी देखील अमित शहांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. रक्षा खडसे म्हणाल्या, अमित शहा यांच्या भेटीसाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. पण, त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण, एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची फोनवर चर्चा झाली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार की नाही याबाबत मला काही कल्पना नाही, असे ते म्हणाल्या. मात्र, या चर्चेमागचं कारण न सांगितल्याने निश्चितच खडसे-शाहांमधील चर्चेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.