मोर्चासाठी जाणाऱ्या भुसावळच्या ३० एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवले

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । मुंबई येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भुसावळ आगारातील ३० संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोल नाक्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री अडवून नशिराबाद पोलिस स्थानकात आणण्यात आले.

दरम्यान, आम्ही आतंकवादी किंवा अन्याय करणारे नाही, आमच्या न्याय्य हक्कांसाठी जात असताना ही अडवणूक का? असा प्रश्न भुसावळ आगारातील संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांवर दबाव असल्याने त्यांनी पुढे जाण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटी महामंडळाच्या तीस कर्मचाऱ्यांना नशिराबाद पोलिस स्थानकात आणण्यात आले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज