fbpx

सावदा शहरात पोलीसांचे रुट मार्च

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । सावदा प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पहाता जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी जिल्ह्यात 28, 29 व 30 मार्च असा तीन दिवस संपूर्ण लॉकडाउन लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सावदा शहरात 28 रोजी सकाळी सावदा पोलिसांनी रुटमार्च काढला.

यावेळी सावदा पोलिसांन सोबतच नगरपालिका कर्मचारी देखील सहभागी झाले होते. शहरातील मुख्यरसत्या सोबत इतर भागातुन देखील हा रुट मार्च मार्गस्थ झाला. यावेळी सपोनी देवीदास इंगोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, पीएसआय पवार, नगरपालिका बांधकाम अभियंता धनराज राणे यांचे सह सावदा पोलीस, होमगार्ड जवान, पालिका कर्मचारी यात सहभागी होते.

savda police 1

दरम्यान 28 पासून हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर शहरात होळी असल्यावर देखील संपूर्ण शुकशुकाट होता सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद होती. आत्यावशक सेवा मेडिकल व दुध डेरी हे सुरू होते. दरम्यान शहरात प्रशासन कडकडित लॉकडाऊन करीत असताना व जनता देखील यास सहकार्य करीत असताना दुसरीकडे येथील बस स्टॅन्ड जवळील बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर एक हॉटेल चालक मात्र अर्धे शटर उघडे ठेवून तेथून सर्रास मद्य विक्री करीत होता यामुळे येथे मद्यप्रेमींची मोठी वर्दळ मात्र सुरू होती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज