अंतुर्ली येथील फौजी ढाबा, अपना ढाबावर पोलिसांचा छापा 

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । अंतुर्ली ( ता. मुक्ताईनगर ) येथील रस्त्यावरील एका ढाब्यावर पोलीसांनी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकुन मुद्देमालासह देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक खताळ यांच्या पथकाने केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे  की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली दुरक्षेत्र परिसरात असलेल्या फौजी ढाबा व अपना ढाबा या दोन ठिकाणी मुक्ताईनगर पोलीसांनी छापा टाकून साडेचार हजार रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केला आहे. तर जुगार अड्ड्यावर धाड टाकून २ हजार ३५० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलीस निरीक्षक खताळ, पोउनि काकडे, पोहकॉ गणेश मनुरे, पो.ना. गजमल पाटील, लतीफ तडवी, पो.कॉ. राहून बेहेनवाला, सुनिल नागरे, विशाल पवार यांनी कारवाई केली.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज