fbpx

अरे बापरे…! पोलिसांच्या तपासणी मोहिमेत आढळले १३३ पॉझिटिव्ह रुग्ण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १ मे पर्यंत संचारबंदी लावला असून या काळात जिल्ह्यात रात्री विनाकारण फिरणाऱ्या २ हजार ६९७ जणांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्यात १३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्याना कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवसांसाठी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व बाधित रूग्ण शोधण्यासाठी रात्री ८ नंतर शहरात संचार करणाऱ्या नागरीकांची रस्त्यावरच ॲन्टीजन टेस्ट करून घेण्याचा उपक्रमास सुरूवात करण्यात आली.

यासाठी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रत्येक चौकात व नाक्यावर पोलीसांनी डॉक्टरांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची ॲन्टजन टेस्ट करण्यास सुरूवात केली. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात २ हजार ६९७ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यात १३३ बाधित आढळून आले आहे. बाधितांना संबंधित तालुक्याच्या ठिकाणच्या कोवीड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी कळविले आहे. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज