fbpx

पोलिसांचे जळगाव शहरात कोंबिंग, २८ वाहने ताब्यात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात शनिवारी सकाळी ७ ते १० वेळेत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक निरीक्षक आणि १४० कर्मचाऱ्यांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले. पथकाने केलेल्या कारवाईत २८ संशयीत वाहने जप्त करण्यात आली आहे.

पथकाने गेंदालाल मील, कांचन नगर, जैनाबाद, पिंप्राळा हुडको, तांबापुरा, मास्टर कॉलनी परिसरात कारवाई केली. कारवाईत २४ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. शहरात ४१६ संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येऊन २८ वाहने ताब्यात घेण्यात आली. 

११ हद्दपार आरोपींची तपासणी केली असता एक घरी मिळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मोटार व्हेईकल ऍक्टप्रमाणे ४५ वाहनांवर कारवाई करून ९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज