⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | १० लाख ९४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

१० लाख ९४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३। जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली असल्याचे दिसत असून चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणत वाढल्या आहे. अशातच भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील घरफोडीतील चार संशयित आरोपींचे भुसावळ तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीला आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिली.

काय आहे प्रकार?
भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावात मालतीबाई अभिमान चौधरी (वय-५७) यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेच्या आधारे गुन्ह्याच्या शोध घेणे सुरू केले. तसेच गावात बैठका घेऊन गावाची सुरक्षा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गावात रात्रीची ग्रस्त घेण्यात आली. दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकीवर तीन जण संशयितरित्या फिरत असताना दिसून आलेत. गावकऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत पोलीसांच्या स्वाधिन केले.

पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आणि ताब्यात घेतलेला तीन आरोपींमधील एकाची ओळख पटली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी रवी प्रकाश चव्हाण (वय-१८) रा. शबरीनगर, तांबपुरा जळगाव, जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा (वय-२२) रा. तांबापुरा आणि सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले.यातील संशयित आरोपी रवी चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा याच्यावर देखील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.