लोकोपायलटला मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । ड्यूटी आटोपून घराकडे जात असलेल्या रेल्वेच्या सहाय्यक लोकोपायलटला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना २० सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे.

भुसावळ शहरातील संभाजी नगरातील रहिवासी चंदन अनिरुद्ध प्रसाद (वय-२८) हे रेल्वे विभागात सहाय्यक लोको पायलट म्हणून नोकरीस असून २० सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ते ड्यूटी आटोपून घराकडे जात असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण करून लुटले होते. रेल्वे गार्ड लाईन रोडवर ही घटना घडली होती. याप्रकरणी चंदन प्रसाद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून चौघा संशयित तरुणांना अटक केली आहे. शाहरूख शेख रज्जाक (वय-२५, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ), विनायक उर्फ विनल प्रल्हाद वाघ (वय-२२, रा.समता नगर, भुसावळ), ईश्वर उर्फ करण कमलेश दमाडे (वय-२२, रा.गांधी नगर, भुसावळ) व यश अशोक परदेशी (वय-२०, रा.पूजा कॉम्प्लेक्स मागे, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाची नावे आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, गणेश धुमाळ, पोलीस नाईक विकास सातदिवे, निलेश चौधरी, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, योगेश महाजन, दिनेश कापडणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, योगेश महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज