fbpx

मदूरा मायक्रोफायनान्स लि.तर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । मदूरा मायक्रोफायनान्स लि. तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत कोरोना संकटकाळात जोखीम घेऊन लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून आज जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात अन्य ५७ पोलीस ठाण्यात पुष्पगुच आणि विविध सुरक्षा वस्तूचे ( मास्क, सॅनिटायझर ) वाटप करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक अमोल पवार, ठाणे अंमलदार भटु पाटील, प्रवीण संगेले, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, निलेश पाटील, अशोक मोरे, मनोज तडवी व अन्य सहकारी तसेच मदुराचे शाखाधिकारी संदीप मानकर व सहकारी अजय जाधव, वैभव पोहनकर, अजय झालटे आणि बचत गटातील सभासद स्वाती कुलकर्णी, संगीता शिंदे हे उपस्थित होते.

RBI मान्यताप्राप्त मदूरा कं. ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबिर, पोलीस प्रशासनाचा सन्मान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, पूरग्रस्त मदत तसेच विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज