fbpx

पीएम किसान योजेनचे २००० रुपये मिळाले नाहीत? तर अशी करा तक्रार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज | १० ऑगस्ट २०२१ |  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा ९ वा हप्ता ९ ऑगस्टला देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांना अद्याप हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत.  जर तुमच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसेल तर पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करता येते.

या व्यतिरिक्त आपण क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता.

अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार
या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचं काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता.

या क्रमांकावर करा संपर्क
पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज