fbpx

केसीईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वृक्षारोपण

 जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ ।  केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रासेयो विभागाच्यावतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे हे अध्यक्ष्स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कबचौउमवि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील व अभय महिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. व्ही.एल.पाटील हे उपस्थित होते. यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

mi advt

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.प्रविण कोल्हे व महिला विभाग प्रमुख डॉ.वंदना चौधरी यांनी केले.यावेळी उपप्राचार्य-डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख-प्रा.निलेश जोशी, प्रा.पंकज पाटील, प्रा.अतुल गोरडे, मोहन चौधरी, विजय चव्हाण, केतन पाटील, शरद सोनार हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज