fbpx

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त नेरी येथे वृक्षारोपण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । भारतातील नामवंत बँक पैकी एक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्ताने शाखा नेरीच्या वतीने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँक मॅनेजर अभय मिश्रा यांनी वर्धापन दिनानिमित्त बँकेतील विविध योजना व अल्पसा इतिहास ग्रामस्थांना सांगितला.

यावेळी उपस्थित सर्वांनी बँकेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित बँक मॅनेजर अभय मिश्रा, बँक कॅशियर छोटेलाल मुराई, किशोर खोडपे, नाना पाटील, आशिष दामोदर, सुनिल वारके, निलेश खोडपे, पवन जैस्वाल, गोमा बोरसे, कडूबा लोहार, राम हिरे, चेतन बोरसे, रमेश कोळी, हर्षल जैन आदी खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज