नियोजन, सातत्य व सराव हीच यशाची त्रिसूत्री : चंद्रकांत भंडारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या वतीने नुकतेच जाहीर झाले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आता आपल्याकडे परीक्षेसाठी शिल्लक असलेले दिवस, आणि अभ्यास विषय याविषयीचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अभ्यासात सातत्य राखून सरावावर विद्यार्थ्यांनी अधिक भर दिला पाहिजे. अभ्याससाहित्य व संदर्भ साहित्याच्या वाचनावर भर देत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच मिळवून त्यानुसार सराव करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन चंद्रकांत भंडारी यांनी केले.

यावेळी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभ्यासाचे तंत्र याविषयावर ते बोलत होते. अभ्यास करीत असतांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी नियमीत व्यायाम, योग व प्राणायम केले पाहिजेत. कोरोना काळात नियमीत शाळा व परीक्षा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांचा लेखन सराव जवळजवळ बंद होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लेखनकार्याकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.ईशा वडोदकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांनी भूषविले. यावेळी समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.प्रसाद देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संध्या महाजन, डॉ. श्रद्धा जोशी, प्रा.जयंत इंगळे, प्रा.योगेश धनगर,प्रा.उमेश ठाकरे, प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.ललित शिंपी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -