fbpx

ग्रामस्थांची माणुसकी : जखमींना ३ किलोमीटर जंगलातून पायपीट करून आणले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ ।  चोपडा तालुक्यातील वर्डी येथील विश्रामपूर जवळच्या नवरा नवरी धरणाच्या वरच्या बाजूला आयत्या बारेलाच्या घराजवळ शुक्रवारी दुपारी शिरपूर येथील एक विमान कोसळले. दरम्यान, ग्रामस्थांनी लागलीच माणुसकी दाखवत जंगलातून देशी जुगाड करून लाकडी दांडा आणि कापडाने स्ट्रेचर तयार करीत जखमींना बाहेर काढले.

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला असून यामध्ये पायलट नसरूद अनिम वय-३० हे जागीच ठार झाले तर एक शिकाऊ महिला पायलट अनशिका गुजर वय-२१ या जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारार्थ चोपडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झालेले विमान हे शिरपूर येथील ट्रेनिंग सेंटरचे असल्याचे समजते. तहसीलदार रावसाहेब गावीत, सहाय्यक निरीक्षक दांडगे घटनास्थळी मदत करीत आहे. ग्रामस्थांनी मदत केल्याने त्याठिकाणी तात्काळ मदत मिळणे शक्य झाले आहे..
https://fb.watch/v/zBVrVdJE/

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज