अहमदाबादहून जळगाव आलेल्या विमानात बिघाड, प्रवाशांना कारने केले रवाना

बातमी शेअर करा

ळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । जळगाव विमानतळावर अहमदाबादहून आलेल्या विमानाच्या इंजिनात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मुंबईकडे हाेणारे उड्डाण रद्द करण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. गैरसोय टाळण्यासाठी अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या ३० प्रवाशांना स्वतंत्र कारने रवाना करण्यात आले.

जळगाव विमानसेवा देणाऱ्या ट्रु-जेट कंपनीचे स्थानिक व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अहमदाबादहून एअरक्राॅफ्ट जळगावात लॅण्ड झाले. विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची बाब वैमानिकाला लक्षात आली असता त्याने व्यवस्थापकांना त्याची कल्पना दिली. त्यांनी अहमदाबाद मुख्यालयाशी संपर्क करून तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन मागवले. त्यावर अहमदाबादहून तीन अभियंत्यांची टीम खास वाहनाने जळगावकडे ‌रवाना झाली. रात्री उशिरा ही टीम जळगावात पोहचली.

विमानात तांत्रिक बिघाड झाला तेव्हा सुमारे ३० प्रवाशी अहमदाबादहून मुंबईसाठी बसले हाेते. त्यांना विमान कंपनीतर्फे स्वतंत्र कारने मुंबईसाठी रवाना करण्यात आले. तसेच ज्यांनी जळगावातून बुकींग केली हाेती. त्यांची बुकिंग रद्द करण्यात आली. दुरुस्तीनंतर रिकामे विमान अहमदाबादसाठी रवाना होईल.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -