⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | सामाजिक | पितृ पक्ष सुरु झाला आहे : या गोष्टी करा तर करू नका या गोष्टी

पितृ पक्ष सुरु झाला आहे : या गोष्टी करा तर करू नका या गोष्टी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।१० सप्टेंबर २०२२ । हिंदू दिनचर्यानुसार भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते. यंदा १० सप्टेंबर पासून ते २५ सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष असणार आहे. तब्बल बारा वर्षांनी जुळून आलेल्या एका योगा नुसार यंदा तब्बल १३ दिवस श्रद्धा काळ चालणार आहे. १७ सप्टेंबर रोजी कोणतेही स्वाध्याय घालता येणार नाही.

आपले पूर्वज या काळात पृथ्वीवर येतात व आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात अशी श्रद्धा म्हणून पितृ पक्ष साजरा केला जातो. असं म्हणतात की पितृपक्षात कोणत्याही घरी आलेल्या पाहुण्याला रिकाम्या हत्ती परत पाठवू नये. महागडी गोष्टच देणं गरजेचं असतं तर काही लहान सहान गोष्ट देखील दिली तरी चालते.

कुत्र्याला हाकलवू नका
कुत्रा हा यमाचा दूत मानला जातो. पितृपक्षात नैवेद्य कुत्र्याला सुद्धा दाखवला जातो. जर तुमच्या दारात पितृपक्षात कुत्रा आला तर त्याला हाकलवून लावू नका, शक्य असल्यास खाऊ घाला. या प्राण्यांना अनेकजण शिळं अन्न खराब झालेले पदार्थ देतात पण हा पूर्वजांचा अपमान ठरू शकतो, त्यामुळे असे करणे टाळावे.

गायीला नैवेद्य दाखवावा
अस म्हणतात कि, गाईच्या देहात ३३ कोटी देवांचा वास असल्याची मान्यता आहे त्यामुळे पितृपक्षात गाय दारात आल्यास तिला नैवेद्यातील जेवण खाऊ घालावे. शहरी भागात हे फार शक्य होत नाही अशावेळी निदान श्राद्धकार्याच्या दिवशी गायीला नैवेद्य दाखवावा. याने पुण्य मिळत.

दान करा
पितृ पक्षात तुमच्या दारी जर कोणी भिक्षा मागायला आले किंवा तुम्हाला वाटेत कोणी मदत मागितली तर निदान मदत करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना पोळी भाकरी जे शक्य असेल ते अन्न दान करा.या दिवसात वस्त्रदान शुभ मानले जाते

कावळ्यांना मान द्या
सर्वप्रथम तर कावळे. पितृपक्षात दारात कावळे आल्यास त्यांना उडवून लावू नका, अन्यथा पूर्वजही नाराज होतात असे म्हणतात. त्यामुळे केवळ श्राद्ध कार्यातच नव्हे इतरही वेळेस कावळ्याला विशेष मान असतो. असं म्हणतात, की ज्याप्रमाणे माणसांना उजेडात पाहण्याची दृष्टी आहे, वटवाघूळ व घुबडाला अंधारात पाहण्याची दृष्टी आहे तसेच कावळ्याला जीवात्मा पाहण्याचे वरदान लाभले आहे. त्यामुळे कावळे दारात येणे हे संकेत मानले जातात.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह