fbpx

जळगाव लाईव्हचा इम्पॅक्ट : मुजलवाडी पुलावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । जळगाव लाईव्हने बातमी प्रकाशित प्रकाशित करताच बातमीची दखल घेत मुजाळवाडी गावाजवळील पुलावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरातील रहिवाशांच्या येण्या जाण्याची व वाहनांची वर्दळ लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाची सुरवात केली

रावेर तालुक्यातील मुजलवाडी गावावरून मध्यप्रदेशातील खारगोन, झिरन्या, चित्तौडगड मार्गे आंतरराज्यीय वाहतूक मार्गावरील मुजलवाडी गावाजवळील पुलावर प्रचंड खड्डे असल्याने रस्ता अरुंद व चिखलमय होता. अपघात होन्याची दाट शक्यता होती.

याबतीत अनेक वेळा मागणी  करूनही दुरुस्तीचे काम होत न होते. जळगाव लाइव्हने 26 जुलैच्या दिवशी ऑनलाइन बातमी प्रकाशित केली.  खड्ड्यांची दुरुस्ती, ग्रामस्थांची मागणी या विषयावर मुख्यत्वे हा प्रश्न उपस्थित केला. याची गंभीर दखल घेत बांधकाम अभियंत्याने तातडीने निर्देश दिले व काम सुरू झाले. हा मार्ग महाराष्ट्र ते मध्यप्रदेश जाणारा मार्ग आहे आणि मुजलवाडी गावच्या नदीवर पूल आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे व पावसामुळे या पुलावर खड्डे, चिखल व गवत वाढले होते. स्थिती अशीच बनली आहे की, दोन्ही बाजूंनी रस्ता खूपच अरुंद झाला होता. म्हणजेच लोकाना व वाहनां येण्या जाण्यासाठी जिकरीचे होते.

दोन्ही बाजूने वाहने जाण्यामुळे मोटारसायकलस्वार खाली पडत होते तर काही वेळा ते घसरत होते. या मार्गावर ट्रक ट्रॉले जातात. या पुलाची साफसफाई मुजलवाडीचे सरपंच योगेश पाटील यांनी केली होती आणि त्या दुरुस्तीची मागणी रावेर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केली होती. जळगाव लाईव्हच्या वृत्ताने समस्या सोडविल्याबद्दल स्थानिक लोकांनी व सरपंच योगेश पाटील, संतोष पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज