पायलट कल्याणी पाटीलचा महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी केला सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील कल्याणी पाटील हिची अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. कल्याणी पाटीलमुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असून महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी तिचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्रिंपी येथील मुळ रहिवासी कैलास पाटील व मोहिनी पाटील यांची कन्या कल्याणी पाटील हिची ही यशस्‍वी वाटचाल जिल्ह्यासाठी मान उंचावणारी आहे. कल्‍याणी हिने नुकताच अमेरिकेत पायलट प्रशिक्षण पूर्ण केले असून १ सप्‍टेंबरला अमेरिकेतील एअरलाईनमध्‍ये ती जॉईन होत आहे.

कल्याणी पाटील हिचा महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -