fbpx

जळगावातील तरुणीने साकारला आगळावेगळा ‘विठ्ठल’

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । एरव्ही नियमीत रंगसंगती वापरून विठ्ठलाचे चित्र अनेकांनी साकारले आहे. मात्र जळगावातील कादंबरी चौधरी हिने निसर्ग आणि आकाशाची सांगड घालणारे रंग वापरत एक आगळावेगळा विठ्ठल साकारला आहे.

विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून, हिंदू धर्मातील वैष्णव पंथांचे प्रमुख दैवत आहे. वारकरी सांप्रदायाचा तर विठ्ठल म्हणजे जीव की प्राण….! संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या आराधनेत अक्षरशः  तल्लीन होऊन जातो व जीवनातील सर्व सुख दुःख विसरून विठ्ठलाशी  एकरूप होतो. अशाच विठूरायाची प्रतिमा अनेक कलाप्रेमी यांनी विविध कल्पनांनी साकारली असून ,  चित्रकार कादंबरी चौधरी हिने सुद्धा एक आगळावेगळा विठ्ठल साकारला आहे. 

mi advt

त्यामध्ये विठुराया हिरव्या आणि निळ्या रंगांमध्ये अत्यंत आकर्षक रित्या रेखाटला असून, हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. तसेच निळा रंग हा अगाध व अमर्याद आकाशाचे प्रतीक आहे. या सर्व विश्वात विठुराया कणाकणात निवास करतो, असा त्याचा अर्थ असून विठ्ठलावर श्रद्धा ठेवल्यास प्रत्येकाच्या आयुष्यातील चिंता त्यामुळे दूर होतात, अशी प्रतिक्रिया कादंबरी चौधरी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज